• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चार जण जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

नेर | प्रतिनिधी

नेर-अमरावती राज्य महामार्गावरील दोडकीजवळील खंडाळा फाटा परिसरात शुक्रवारी सकाळी प्रवासी टेम्पो ट्रॅव्हल आणि मालवाहू आयशर वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हल चालकाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मृत चालकाचे नाव रमेश चितोडिया (वय ३०) असे आहे. तर कविता चितोडिया (वय २५), वैजयंती चितोडिया (वय १९), मुनाफ खान (वय ६०, रा. नेर) आणि रशीद शहा (वय ४०, रा. अजंती खाकी) हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमपी ०९ बीए ५५८७ क्रमांकाचा टेम्पो ट्रॅव्हल मोर्शीहून नेरकडे येत होता. या वाहनातून जडीबुटी व्यवसाय करणारे चितोडिया कुटुंब प्रवास करत होते. त्याचवेळी एमएच २७ एक्स ८४५३ क्रमांकाचे आयशर मालवाहू वाहन तेलाची पिपे घेऊन नेर-अमरावती मार्गावर जात होते.

खंडाळा फाट्याजवळ टेम्पो ट्रॅव्हल चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट आयशर वाहनावर जाऊन आदळले. धडक इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तसेच आयशर वाहनाचेही मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच नेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सावंतवाडी नगराध्यक्षांवर गंभीर आरोप; ठेकेदारांकडून ‘टक्केवारी’ उकळल्याचा मायकल डिसोझांचा दावा

Next Post

100 टक्के अनुदानित सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

100 टक्के अनुदानित सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In