• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोडामार्ग शहरातील बंद सीसीटीव्ही तातडीने सुरू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी

कसई-दोडामार्ग शहरातील मुख्य चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट यांच्यासह व्यापारी आणि नागरिकांनी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील महत्त्वाच्या चौकांमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडल्याने वाहनचोरी, घरफोडी यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असून अशा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, खासगी आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून राहावे लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

शहराचा ‘तिसरा डोळा’ म्हणून ओळखली जाणारी ही यंत्रणा बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच गुन्हेगारी, वाहतूक समस्या आणि अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवणेही कठीण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे कसई-दोडामार्ग मुख्य चौकासह शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करून नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी रुपेश मयेकर, सुधीर पनवेलकर, समीर रेडकर, पिकी कवठणकर, अशोक नाईक, सुदेश मलिक, भूषण सावंत, दीपक बुगडे, नितीन मनेरीकर आणि बाळा रेडकर उपस्थित होते. त्यांनीही शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

Previous Post

भोर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Next Post

तळेगाव पोलिसांची धडक कारवाई; ६.४५ लाखांचा मोहा सडवा व हातभट्टी साहित्य जप्त

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
9
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
23
Next Post

तळेगाव पोलिसांची धडक कारवाई; ६.४५ लाखांचा मोहा सडवा व हातभट्टी साहित्य जप्त

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In