• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तळेगाव पोलिसांची धडक कारवाई; ६.४५ लाखांचा मोहा सडवा व हातभट्टी साहित्य जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या अवैध दारूविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामनेर शिवारात करण्यात आलेल्या कारवाईत ६ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RelatedPosts

बोरीवडे गावची कन्या डॉ. सुजाता पवार यांची एमबीबीएस पदवी संपादन; गावातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान

शाहूवाडी औद्योगिक क्षेत्राला उच्चाधिकार समितीची मान्यता; २७३ हेक्टर क्षेत्र संपादनास मंजुरी

आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या भव्य नव्या इमारतीचे उद्घाटन

१४ जून २०२६ रोजी विशेष दारूबंदी पथक, आर्वी उपविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा जामनेर शिवारात छापा टाकण्यात आला. ही कारवाई आरोपी राजू बाष्टीघाट (रा. तळेगाव) यांच्या शेतात करण्यात आली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी २४ लोखंडी ड्रममध्ये साठवून ठेवलेला सुमारे ४,००० लिटर मोहा सडवा तसेच गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६,४५,६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आरोपी राजू बाष्टीघाट याच्याविरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत विशेष दारूबंदी पथकातील पद्माकर मुंडे, कल्पेष मगरे, राजेश, प्रतिक, शिल्पा आणि चालक सूरज भागने यांनी सहभाग घेतला.

अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Previous Post

दोडामार्ग शहरातील बंद सीसीटीव्ही तातडीने सुरू करण्याची मागणी

Next Post

वर्धा पोलीस दलाचा गौरव; पंकज टाकोणे यांची वर्ल्ड स्कूल गेम्ससाठी भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड

Related Posts

Blog

बोरीवडे गावची कन्या डॉ. सुजाता पवार यांची एमबीबीएस पदवी संपादन; गावातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान

June 15, 2026
0
Blog

शाहूवाडी औद्योगिक क्षेत्राला उच्चाधिकार समितीची मान्यता; २७३ हेक्टर क्षेत्र संपादनास मंजुरी

June 15, 2026
2
Blog

आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या भव्य नव्या इमारतीचे उद्घाटन

June 15, 2026
1
Blog

देहदानाचा अवमान खपवून घेणार नाही; आक्षेपार्ह वक्तव्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजराकडून तीव्र निषेध

June 15, 2026
5
Blog

वणीत एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक; १.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 15, 2026
3
Blog

शनी मंदिर परिसर अंधारात; सहा दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद, भाविकांमध्ये नाराजी

June 15, 2026
3
Next Post

वर्धा पोलीस दलाचा गौरव; पंकज टाकोणे यांची वर्ल्ड स्कूल गेम्ससाठी भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड

ताज्या बातम्या

बोरीवडे गावची कन्या डॉ. सुजाता पवार यांची एमबीबीएस पदवी संपादन; गावातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान

June 15, 2026

शाहूवाडी औद्योगिक क्षेत्राला उच्चाधिकार समितीची मान्यता; २७३ हेक्टर क्षेत्र संपादनास मंजुरी

June 15, 2026

आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या भव्य नव्या इमारतीचे उद्घाटन

June 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In