• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक योगासन स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सीमा पवार यांचा चोंडी व बावी येथे सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

जामखेड | प्रतिनिधी :
अहमदाबाद (गुजरात) येथे ४ ते ८ जून २०२६ दरम्यान झालेल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावून देशासह अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या जामखेड तालुक्यातील बावी येथील सीमा पवार यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला.

बावी येथील श्री सिद्धनाथ मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच चोंडी येथे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सीमा पवार यांचा सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सीमा पवार यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणींना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

सीमा पवार यांनी ‘सीनियर ए महिला’ गटातील ‘ट्विस्टिंग बॉडी’ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत जगातील ७६ देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. नोकरीची जबाबदारी सांभाळत सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

सीमा पवार या सध्या पुणे येथे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके, तसेच राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमास पत्रकार श्वेता गायकवाड, धनसिंग साळुंके, अमृत कारंडे, गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा मतदारांशी संवाद; लातूर ग्रामीणमधून मोठे मताधिक्य देणार – रमेश कराड

Next Post

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील भिक्षावृत्तीविरोधात संयुक्त मोहीम; अनेकांना ताब्यात

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील भिक्षावृत्तीविरोधात संयुक्त मोहीम; अनेकांना ताब्यात

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In