• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा मतदारांशी संवाद; लातूर ग्रामीणमधून मोठे मताधिक्य देणार – रमेश कराड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

लातूर | प्रतिनिधी :
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी रविवारी लातूर येथे मतदारांशी संवाद साधला. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही आमदार रमेश कराड यांनी यावेळी दिली.

लातूर येथील ‘प्रयाग’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत बसवराज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी रमेश कराड यांच्या हस्ते बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार यांचा सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

यावेळी बोलताना रमेश कराड यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांबरोबरच इतर मतदारांनाही सोबत घेऊन बसवराज पाटील यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बसवराज पाटील यांचा विजय महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.

बसवराज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा निर्धार व्यक्त केला. मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच उपस्थित मतदारांशी त्यांनी थेट संवाद साधला.

बैठकीस भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती शिवकन्या गोडभरले, जिल्हा परिषद सदस्य महादेव साळुंके, छायाबाई चिंचोलकर, पंचायत समिती सभापती मोनिका सूर्यवंशी, उपसभापती शरद दरेकर, अभिषेक अकनगिरे, खैरुनिसा आत्तार, दत्ता सरवदे यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सिंगल युज प्लास्टिकविरोधात मनपाची कारवाई; १० किलो प्लास्टिक जप्त, ९,३०० रुपयांचा दंड वसूल

Next Post

जागतिक योगासन स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सीमा पवार यांचा चोंडी व बावी येथे सत्कार

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
8
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
2
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
9
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
19
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
6
Next Post

जागतिक योगासन स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सीमा पवार यांचा चोंडी व बावी येथे सत्कार

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In