• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेसा मोबिलायझर्सची पदे कमी करण्याच्या निर्णयाविरोधात संघर्ष समितीचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

‘तीन गावांना एक मोबिलायझर’ निर्णय अन्यायकारक; आमदार व BDO यांना निवेदन

पांढरकवडा, दि. १५ जून २०२६: पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या ग्रामसभा मोबिलायझर्सची पदसंख्या कमी करण्याच्या शासन निर्णयाविरोधात पेसा ग्रामसभा मोबिलायझर्स कर्मचारी संघर्ष समिती, यवतमाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आर्णी-केळापूरचे आमदार राजुभाऊ तोडसाम तसेच पांढरकवडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांना निवेदन सादर केले.

समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सन २०१६ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक पेसा ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामसभा मोबिलायझरची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नव्या निर्णयानुसार तीन ग्रामपंचायतींसाठी एकच मोबिलायझर नेमण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. हा निर्णय आदिवासी भागातील वास्तव परिस्थितीला धरून नसून अन्यायकारक असल्याचा आरोप समितीने केला आहे.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

संघर्ष समितीच्या अध्यक्षा कॉ. ज्योत्स्ना महेश उईके यांनी सांगितले की, आदिवासी भागातील भौगोलिक परिस्थिती अत्यंत दुर्गम असून मोबिलायझर्स गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प मानधनावर काम करत आहेत. अशा परिस्थितीत पदे वाढविण्याऐवजी कमी करण्याचा निर्णय म्हणजे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला खीळ घालण्यासारखा आहे.

निवेदनात शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र मोबिलायझर कायम ठेवावा आणि त्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण करणारा हा निर्णय आदिवासी स्वशासनाच्या संकल्पनेलाच धक्का देणारा असल्याचे समितीने म्हटले आहे. शासनाने मागणीची दखल घेतली नाही तर राज्यभरातील पेसा मोबिलायझर्स, विविध सामाजिक संघटना आणि समविचारी राजकीय पक्षांच्या सहकार्याने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी संघर्ष समितीच्या अध्यक्षा कॉ. ज्योत्स्ना महेश उईके, उपाध्यक्षा कॉ. मीनाताई प्रकाश उईके यांच्यासह खुलनाताई मनोज तोडसाम, सुवर्णा लक्ष्मण धुर्वे, गौतमा डिंगबार सोयाम, अर्चना विनय मडावी, माला रामदास सोयाम, निकिता लक्ष्मण सोयाम, सुनिता भगवान खुन्याम, लक्ष्मी लक्ष्मीकांत गेडाम, मंगला वासुदेव तुमनाळे व रेता विजय तुमनाळे आदी उपस्थित होत्या.

Previous Post

शाळांची घंटा वाजली; नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहात सुरुवात, शाळा परिसर गजबजला

Next Post

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
3
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
5
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
22
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
14
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In