• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माय मराठीचे संवर्धन करणारी जिल्हा परिषद शाळा नव्या रूपात सज्ज; मोहिदे येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

“गावात मराठी शाळा टिकली तर भाषा टिकेल आणि भाषा टिकेल तरच आपली संस्कृती टिकेल,” या विचारातून मोहिदे (ता. शहादा) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचा संपूर्ण कायापालट करण्यात आला असून, नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

RelatedPosts

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

गावातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून शाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नव्या रूपात सजलेल्या शाळेमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील अनेक पिढ्यांचे शिक्षण या शाळेत झाले असल्याने शाळेशी गावकऱ्यांचे भावनिक नाते आहे. शाळेचे जीर्ण झालेले छत, खराब झालेल्या भिंती आणि इमारतीची दुरवस्था दूर करून तिला आकर्षक व आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे.

चेतन पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सरपंच सौ. श्रद्धाताई पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम साकार झाला. आमदार राजेशदादा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विकासासाठी विविध कामे करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील, प्रकाश तुकाराम पाटील, विजू आण्णा, जाधव बापू, चेतन पाटील आणि युवराज नत्थू भिल यांच्या अथक परिश्रमातून शाळेचे रूप पालटले आहे. विशेषतः युवराज भिल यांनी रात्रंदिवस मेहनत घेत शाळेच्या सुशोभीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले तसेच शिक्षणाचे महत्त्वही पटवून देण्यात आले.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील, प्रकाश पाटील, पुरुषोत्तम आण्णा (विजू आण्णा), जाधव बापू, माजी ग्रामपंचायत सदस्य ईश्वरभाऊ महिरे, प्रकाशभाऊ गिरासे, मुन्नाभाऊ, युवराज भिल, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ईश्वरभाऊ महिरे यांनी सांगितले की, “मोहिदे गावच्या शाळेचा कायापालट करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळेच मायमराठीचे संवर्धन करणारी ही शाळा नव्या वैभवाने उभी राहिली आहे.”

शाळेच्या नव्या रूपामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण झाला असून, ग्रामीण भागातील मराठी शाळांच्या जतन व संवर्धनासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post

शहादा पालिकेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘नवीन प्रवेश उत्सव’ उत्साहात; विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वाटप

Next Post

शहादा-धुळवद एस.टी. बस पूर्ववत सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

Related Posts

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली
Blog

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

September 24, 2026
0
Blog

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

September 24, 2026
3
निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
7
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
6
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
40
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
29
Next Post

शहादा-धुळवद एस.टी. बस पूर्ववत सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

ताज्या बातम्या

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

September 24, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

September 24, 2026
निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In