• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा-धुळवद एस.टी. बस पूर्ववत सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

कोरोना काळात बंद करण्यात आलेली शहादा-धुळवद-शहादा मुक्कामी एस.टी. बस सेवा अद्याप सुरू न झाल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही महत्त्वाची बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी प्रतिनिधी जगदीशभाई रघुनाथभाई पटेल आणि परिसरातील ग्रामस्थांनी शहादा आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सुमारे २५ वर्षांपासून शहादा आगारातून शहादा-धुळवद ही बस नियमितपणे धावत होती. या बसमुळे महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील निझर, वेलदा, मुबारकपूर, वांका चार रस्ता, सरवाळा, देवाळा, पिपलोद आणि व्यावल यांसह अनेक गावांतील नागरिकांना शहादा येथे ये-जा करण्याची सोय उपलब्ध होती.

मात्र, कोरोना महामारीच्या काळात ही बस सेवा बंद करण्यात आली आणि त्यानंतर ती अद्याप पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांना दैनंदिन कामांसाठी तसेच शासकीय, शैक्षणिक आणि व्यापारी कारणांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शहादा हे या परिसरातील प्रमुख व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र असल्याने अनेक नागरिक दिवसभराची कामे पूर्ण करून या मुक्कामी बसने घरी परतत असत. बस सेवा बंद झाल्यानंतर प्रवाशांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे आर्थिक भार वाढला आहे.

या संदर्भात प्रवाशांनी अनेक वेळा शहादा आगार प्रशासनाकडे तोंडी व लेखी पाठपुरावा केला आहे. तसेच आमदार राजेश पाडवी यांनीही बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत शिफारस पत्र दिले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या मार्गावर पूर्वी मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असल्याने एस.टी. महामंडळालाही चांगले उत्पन्न मिळत होते. त्यामुळे बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होण्याबरोबरच महामंडळाच्या महसुलातही वाढ होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

एस.टी. महामंडळाच्या “बहुजन सुखाय, बहुजन हिताय” या ब्रीदवाक्यानुसार सीमावर्ती भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन शहादा-धुळवद मुक्कामी बस सेवा तात्काळ सुरू करावी, अशी आग्रही मागणी जगदीशभाई पटेल आणि परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आता याबाबत शहादा आगार प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

माय मराठीचे संवर्धन करणारी जिल्हा परिषद शाळा नव्या रूपात सज्ज; मोहिदे येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Next Post

व्हॉलंटरी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांचे अनोख्या उपक्रमांनी स्वागत

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
5
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
5
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
36
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
24
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
19
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
10
Next Post

व्हॉलंटरी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांचे अनोख्या उपक्रमांनी स्वागत

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In