• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्हॉलंटरी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांचे अनोख्या उपक्रमांनी स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण करण्यासाठी शहादा येथील नामांकित व्हॉलंटरी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नवागत व जुन्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बाल हक्क व सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. स्मिता जैन, ॲड. राजेश कुलकर्णी, प्रविणा कुलकर्णी, ताराबाई बेलदार, मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे, प्राचार्या नयना पाटील आणि विद्या बोरसे उपस्थित होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. संजय पुराणिक यांनी शिक्षणासोबतच मूल्यसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी, करुणा, आदर आणि समतेसारखे गुण विकसित होणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

प्रवेशोत्सवानिमित्त शाळा परिसर रंगीबेरंगी फुगे, फुले आणि तोरणांनी सजविण्यात आला होता. पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी दप्तराचे ओझे न वाटता आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळावा यासाठी इंग्रजी, मराठी, गणित, इतिहास आणि भूगोल विषयांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले होते. खेळ, प्रात्यक्षिके आणि संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांची ओळख करून देण्यात आली. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता पाटील यांनी केले, तर ललिता राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थी, पालक आणि उपस्थित मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Previous Post

शहादा-धुळवद एस.टी. बस पूर्ववत सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

Next Post

संविधानाच्या चौकटीत काम केल्यास भारतीय संविधानाची खरी ताकद दिसून येईल – माणिकराव बनसोडे

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
3
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
5
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
23
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
14
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post

संविधानाच्या चौकटीत काम केल्यास भारतीय संविधानाची खरी ताकद दिसून येईल – माणिकराव बनसोडे

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In