• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांभुर्डीत ‘थेट तलावातून पाणीपुरवठ्या’च्या नावाखाली दूषित पाणी; नागरिकांमध्ये संताप, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथे पाण्याच्या टाकीत साठवणूक न करता थेट तलावातून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना राबवली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची चर्चा झाली असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांना दूषित व अस्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पारंपरिक पद्धतीनुसार पाणी प्रथम टाकीत साठवून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. मात्र, चांभुर्डी येथील योजनेत कोणतीही फिल्टर यंत्रणा न बसवता तलावातील पाणी थेट गावठाणातील नळजोडण्यांना पुरवले जात आहे. त्यामुळे तलावातील गाळयुक्त आणि दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे.

सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलावातील पाण्यात गाळ, कचरा आणि अस्वच्छता वाढली असून, त्याच पाण्याचा थेट पुरवठा होत असल्याने जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. “थेट तलावातील कचरा आणि दूषित पाणी आमच्या ताटात वाढले जात आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

या योजनेच्या तांत्रिक मंजुरीबाबत तसेच संबंधित अभियंत्यांच्या कार्यपद्धतीबाबतही ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोणतीही साठवणूक किंवा शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी तसेच ग्रामस्थांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Previous Post

शिक्षक संघटना श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी बापूसाहेब गायकवाड तर सचिवपदी पंढरीनाथ सुपेकर यांची निवड

Next Post

आढीव जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
2
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
5
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
2
Next Post

आढीव जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In