• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तहानलेले ‘भवन’ : ग्रामपंचायतीच्या कर्तव्यशून्यतेचा फटका; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : | दि. १५ जून २०२६

सिल्लोड तालुक्यातील भवन गावात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून, गेल्या २० ते २५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. वाढते तापमान, कोरडे पडलेले नळ आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे भवन गावातील नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भवन गावात पाण्यासाठी नागरिकांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत. घरात पिण्याचे पाणी नसल्याने दैनंदिन कामे ठप्प झाली असून, शाळकरी मुलांच्या अंघोळीपासून ते जेवणाच्या तयारीपर्यंत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. “आम्ही जगायचे तरी कसे?” असा सवाल महिलांनी प्रशासनाला केला आहे.

दरम्यान, गावातील पाणीटंचाईचा फायदा घेत खासगी टँकर व्यवसाय फोफावत असल्याचे चित्र दिसत आहे. एका टँकरसाठी नागरिकांना १००० ते १२०० रुपये मोजावे लागत असून, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांवर याचा मोठा ताण पडत आहे. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग निष्क्रिय ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

अशा कठीण परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील साळवे यांनी स्वतःच्या बोअरवेलमधून नागरिकांना मोफत पाणी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिलांनी त्यांच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे जाहीर आभार मानले.

पाणीअभावी गावातील स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. संडास आणि स्नानगृहांचा वापर करणे कठीण झाले असून, महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शासन एकीकडे स्वच्छता अभियान राबवत असताना भवन ग्रामपंचायतीकडून मात्र मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

“आमच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा संतप्त महिला मंडळाने दिला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

आता तरी जिल्हा प्रशासन भवन गावातील नागरिकांच्या पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Previous Post

वनविभागाकडून त्रास दिलेल्या आदिवासी कुटुंबाची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट

Next Post

इतिहास विषयात पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. युवराज मुंडे यांचा सत्कार

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

इतिहास विषयात पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. युवराज मुंडे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In