• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : लातूर

लातूर : लातूर विमानतळावरील अत्यावश्यक पायाभूत सुविधा विकसित करून विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने तब्बल ५६ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच विमानतळाच्या परिवलनासाठी प्रतिवर्षी ३७.७८ लाख रुपयांच्या खर्चासही शासनाने मान्यता दिली असून यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

लातूर विमानतळाच्या विकासाचा विषय जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी वेळोवेळी शासन दरबारी लावून धरला होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून विमानतळाच्या विकासासाठी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

यामध्ये ३.३८ किलोमीटर लांबीची संरक्षण भिंत उभारणे, ४.५ मीटर रुंदीचा आणि ८ किलोमीटर लांबीचा रस्ता निर्माण करणे, धावपट्टी सुधारणा कामे, नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करणे, अग्निशामक केंद्र, आपत्कालीन सेवा केंद्र, अँटी हायजॅकिंग रूमचे नूतनीकरण तसेच अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

या सर्व विकासकामांमुळे लातूर विमानतळाचा सर्वांगीण विकास होऊन विमानसेवा अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लातूर विमानतळाच्या विकासासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी विधीमंडळात आवाज उठवण्याबरोबरच मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उद्योगमंत्री Uday Samant यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासन स्तरावर या विषयाला गती मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.

Tags: Sanjay Kalwale
Previous Post

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

Next Post

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
32
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
67
Next Post

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In