• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले; भव्य जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 17 (प्रतिनिधी)

शौर्य, स्वाभिमान आणि देशभक्तीचे प्रतीक वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त शहादा शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली. ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय’च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

शहादा तालुका श्री क्षत्रिय राजपूत समाज मंडळ आणि जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळी स्वामी समर्थ चौकालगत असलेल्या महाराणा प्रताप स्मारक स्थळी समाज पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दुपारी मान्यवरांनी स्मारकस्थळी पुष्पांजली अर्पण केली.

सायंकाळी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरील प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीदरम्यान भगवे झेंडे, आकर्षक सजावट आणि ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता.

मिरवणूक बाजारपेठेतून जात असताना ‘महाराणा प्रताप की जय’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. संपूर्ण शहरात भगवे झेंडे, फलक आणि तोरणे लावून उत्सवमय वातावरण निर्माण करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रा. मकरंद पाटील, डॉ. कांतीलाल टाटिया, अजय शर्मा, जयपालसिंह रावल, ॲड. सुवर्णसिंग गिरासे, प्रीती पाटील, प्रा. संजय जाधव, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. स्वच्छता विभागाने मिरवणूक मार्गाची विशेष साफसफाई केली होती, तर शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शहादा तालुका राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष संजय राजपूत यांनी मानले. जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

शहाद्यात वाल्मिकी माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; पुस्तक वाटप व पर्यावरण प्रतिज्ञेने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

Next Post

शहाद्यात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पतंजली समितीकडून भव्य योग शिबिराचे आयोजन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

शहाद्यात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पतंजली समितीकडून भव्य योग शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In