• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हिंजवडी एमडी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे खंडाळ्यापर्यंत; माजी उपसरपंचासह सात जणांवर गुन्हा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

खंडाळा प्रतिनिधी

पुणे येथील हिंजवडी परिसरात उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन आता सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यापर्यंत पोहोचले असून, या प्रकरणात अहिरे गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आरोपी असल्याचे समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड पुणे आणि खंडाळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींच्या खंडाळ्यातील घरावर धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे 28.44 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत अंदाजे 2 लाख 84 हजार 400 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी अक्षय प्रदीप धायगुडे, दयानंद उत्तम धायगुडे, महेश पुनाराम किचड उर्फ बिश्नोई, अश्फाक उर्फ मोन्या काझी (सर्व रा. अहिरे, ता. खंडाळा) तसेच हनुमान किलेरी उर्फ बिश्नोई (सध्या रा. खंडाळा) यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. 11 जून 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील मुक्ताईनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी सापळा रचून अक्षय प्रदीप धायगुडे (वय 31), दयानंद उत्तम धायगुडे (वय 38) आणि महेश पुनाराम किचड उर्फ बिश्नोई (वय 21) या तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून 61.70 ग्रॅम एमडी ड्रग्ज, तीन मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन असा एकूण 11 लाख 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपींकडे कसून चौकशी केली असता अश्फाक उर्फ मोन्या काझी आणि हनुमान किलेरी उर्फ बिश्नोई यांची नावे समोर आली. हे दोघे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माजी उपसरपंचच आरोपी असल्याने खळबळ

या प्रकरणातील आरोपी दयानंद उत्तम धायगुडे हा अहिरे गावचा माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असल्याचे उघड झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधीवरच अमली पदार्थ प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण खंडाळा तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

Previous Post

ग्रामीण रुग्णालय सावली येथे कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Next Post

पाटोदा आगार प्रमुखपदी डोके साहेब रुजू; कामगार संघटनेकडून उत्साहात सत्कार

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

पाटोदा आगार प्रमुखपदी डोके साहेब रुजू; कामगार संघटनेकडून उत्साहात सत्कार

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In