• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी :

तालुक्यातील करणवाडी येथील शेतकरी संदीप सदाशिव उंबरे यांनी आपल्या मागण्यांसाठी मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

मिळालेल्या माहितीनुसार, करणवाडी, खडकी, घोरधडा आणि नरसाळा या गावांना जोडणारा शिवदुरा पांदण रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समस्येबाबत अनेक वेळा तहसील प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे उपोषणकर्ते संदीप उंबरे यांनी सांगितले.

शेतकरी हा “जगाचा पोशिंदा” म्हणून ओळखला जातो, मात्र त्यालाच न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी थेट तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ उपोषण न करता स्वतःची बैलगाडी, दोन बैल, एक गाय आणि एक वासरू यांनाही सोबत आणत आंदोलन अधिक लक्षवेधी केले आहे.

उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, समस्या मांडण्यासाठी तहसीलदारांकडे गेल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, प्रशासकीय स्तरावर कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून अनेक नागरिकांनी घटनास्थळी भेट देत शेतकऱ्याला पाठिंबा दर्शविला आहे. “यापूर्वी अनेक आंदोलने पाहिली, मात्र स्वतःची जनावरे घेऊन तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला शेतकरी प्रथमच पाहायला मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

तालुक्यातील नागरिकांनी तहसील प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची पडताळणी करून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर हस्तक्षेप करून संबंधित पांदण रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

Next Post

दोंडाईचा येथे दिव्यांग जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी; ‘रोटरी अपंग राऊंड टाऊन’चा स्तुत्य उपक्रम

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
160
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
60
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

दोंडाईचा येथे दिव्यांग जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी; ‘रोटरी अपंग राऊंड टाऊन’चा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In