• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणी-हिंगोली मतदारसंघात 99.79 टक्के मतदान; २२ जूनला कोण मारणार बाजी?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

परभणी, प्रतिनिधी : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. तब्बल 99.79 टक्के मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून आता २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार सईद खान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यात तिरंगी व अटीतटीची लढत होत आहे. तिन्ही उमेदवारांनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने निकालाबाबत विविध राजकीय अंदाज व्यक्त केले जात आहेत.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

निवडणूक प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान पार पडले. परभणी, सेलू, गंगाखेड, पाथरी, हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथील मतदान केंद्रांवर एकूण ४६६ मतदारांपैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ९९.७९ इतकी नोंदविण्यात आली.

विशेष म्हणजे परभणी, गंगाखेड, पाथरी, हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या सहा मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. तर सेलू येथे एका मतदाराने मतदान न केल्याने तेथे ९८.३१ टक्के मतदानाची नोंद झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांपुरती मर्यादित असलेल्या या निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक मानले जात आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग, पक्षीय समीकरणे आणि वैयक्तिक संपर्क यांचा निकालावर किती प्रभाव पडणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सईद खान, डॉ. विवेक नावंदर आणि सुशील देशमुख यांच्यातील तिरंगी संघर्षामुळे निकालाबाबत कोणताही ठाम अंदाज व्यक्त केला जात नसला, तरी तिन्ही गटांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. त्यामुळे २२ जून रोजी मतपेटीतून नेमका कोणाच्या बाजूने कौल निघणार, याकडे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडल्याने निवडणूक प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून मतमोजणीसाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. आता चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो, हे स्पष्ट होणार आहे.

Previous Post

सिंधुदुर्गसाठी मोठी बातमी : खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’अंतर्गत ४७ कोटींपेक्षा अधिक निधीचे १२ पूल मंजूर!

Next Post

महावितरणाच्या निष्क्रिय कारभाराचा बळी; “शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन ठार”

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
8
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
14
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
6
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
4
Next Post

महावितरणाच्या निष्क्रिय कारभाराचा बळी; "शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन ठार"

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In