• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महावितरण विरोधात पंढरपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; शेतकऱ्यांचा संताप व्यक्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

पंढरपूर | प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महावितरणच्या विरोधात आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा माननीय अभिजित आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी व विविध शेतकरी संघटनांच्या उपस्थितीत पार पडला.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

महावितरणच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, पूर्वी मिळणारा सहा तासांचा थ्री-फेज वीजपुरवठा आता केवळ पाच तासांवर आणण्यात आला असून, तोही सतत लपंडाव खेळत आहे. अचानक वीज खंडित होत असल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील उभ्या पिकांना मोठा फटका बसत असून अनेक पिके पाण्याअभावी जळण्याच्या स्थितीत आहेत.

आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सरकारवर टीका केली. “हे सरकार शेतकऱ्यांना सावत्र लेकरांसारखी वागणूक देत आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. उन्हात तळपत मोठ्या संख्येने शेतकरी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी इशारा देताना सांगितले की, “दि. 23 पर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून बाहेरून कुलूप लावण्यात येईल.”

या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Previous Post

खटाव तालुक्यात अवैध गुटखा, दारू व मटका व्यवसायाला ऊत; कारवाईची मागणी

Next Post

प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर आगरी सेना धावून आली; मांडे, टेंभीखोडावेसह विटी लाईन गावांची तहान भागवली

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
18
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर आगरी सेना धावून आली; मांडे, टेंभीखोडावेसह विटी लाईन गावांची तहान भागवली

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In