• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

लोणी प्रतिनिधी :

लोणी, दि. २० जून : मंचर–लोणी–शिरूर तसेच राजगुरूनगर–पाबळ–लोणी या मार्गांवर शटल बस सेवा सुरू करण्याच्या मागणीची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सकारात्मक दखल घेतली असून संबंधित प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पुणे विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

भाजपा आंबेगाव तालुका अध्यक्ष किरण बाबाजी वाळुंज यांनी ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार व व्यावसायिकांना नियमित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने परिवहन मंत्र्यांकडे निवेदन सादर करून या दोन्ही मार्गांवर शटल बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयामार्फत हे निवेदन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाकडे पाठविण्यात आले. संबंधित विषय पुणे विभागाशी निगडित असल्याने प्रस्ताव विभाग नियंत्रक, पुणे विभाग यांच्याकडे आवश्यक कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या पत्रातून देण्यात आली आहे. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मंचर–लोणी–शिरूर आणि राजगुरूनगर–पाबळ–लोणी या मार्गांवर शटल बस सेवा सुरू झाल्यास परिसरातील हजारो विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, नियमित आणि परवडणारी होण्यास यामुळे मदत होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, एसटी प्रशासनाने मागणीची दखल घेतल्याबद्दल किरण बाबाजी वाळुंज यांनी परिवहन मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. संबंधित मार्गांवर लवकरात लवकर शटल बस सेवा सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

Next Post

वगरवाडीचे सरपंच बबनराव कदम यांच्या मुलाचे अपघाती निधन

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
26
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
8
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
23
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
10
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
16
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

वगरवाडीचे सरपंच बबनराव कदम यांच्या मुलाचे अपघाती निधन

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In