• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

परभणी प्रतिनिधी :

दि. २० जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली. हनुमान मंदिराच्या परिसरातील मंडपाचे छत अचानक कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ३० ते ३५ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

शनिवार निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तनासाठी परिसरातील तसेच बाहेरील गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक मंडपाचे छत कोसळल्याने मंडपाखाली बसलेले अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रघुनाथ धगे यांनी तात्काळ पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयासह इतर जवळच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे.

दरम्यान, मृत आणि जखमींची अधिकृत यादी जाहीर करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून संपूर्ण परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर मंदिर परिसरातील बांधकाम सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Previous Post

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

Next Post

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
9
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
32
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
19
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In