• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा; सुजयदादा विखे पाटील विचार मंचाचा स्तुत्य उपक्रम

चिचोंडी पाटील, दि. २२ जून २०२६ :
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिचोंडी पाटील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. सुजयदादा विखे पाटील विचार मंच, चिचोंडी पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस १५ जून रोजी संपन्न झाला. यानिमित्त त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांना वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. बॅनरबाजी, फटाके, हारतुरे यांसारख्या दिखाऊ खर्चाऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजू घटकांना मदतीचा हात द्यावा, असा संदेश त्यांनी दिला होता.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

त्यांच्या या सामाजिक विचारातून प्रेरणा घेत सुजयदादा विखे पाटील विचार मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना शैक्षणिक साहित्य खरेदी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती करून गाव, समाज आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.

वाढदिवसासारखे वैयक्तिक कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत साजरे करण्याची गरज असून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच खरी समाजसेवा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी मार्केट कमिटीचे माजी संचालक बाजीराव हजारे, माजी सरपंच मनोज कोकाटे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अशोक कोकाटे, माजी सरपंच पांडुरंग ससे, माजी सरपंच अमोल कोकाटे, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस बबनराव शेळके, माजी उपसरपंच महेश जगताप, माजी उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, माजी उपसरपंच महादजी कोकाटे, माजी चेअरमन राजेंद्र कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य दीपक हजारे, राम खराडे, शालेय समिती अध्यक्ष ह.भ.प. दिपालीताई कोकाटे, युवा नेते विजय गाडे, शैलेश पवार, अशोक खराडे, दीपक कांबळे, देविदास शेळके, अंबादास कोकाटे, महादेव हजारे, मयूर बोरा, शाम कोकाटे, सतीश कोकाटे, भाऊसाहेब वाडेकर, मनोज गाडेकर, सचिन खडके, दत्ता वाडेकर, संभाजी खडके, मोहन कोकाटे, दत्ता धलपे, मयूर पवार, प्रशांत दळवी, पावशे देवा, मुख्याध्यापक पाटील सर व सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

तसेच सुजयदादा विखे पाटील विचार मंचाचे पदाधिकारी, गावातील आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

Previous Post

पाऊस पडावा, राज्यावरील संकट दूर व्हावे यासाठी गणरायाकडे साकडे; पर्जन्य सूक्त पठण

Next Post

बनावट दूध हटणार, शेतकऱ्यांचा फायदा होणार : FDA आयुक्त तुकाराम मुंढे

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

बनावट दूध हटणार, शेतकऱ्यांचा फायदा होणार : FDA आयुक्त तुकाराम मुंढे

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In