• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा शहरात भरदिवसा तीन घरफोड्या; १४.५ लाखांचे दागिने व दुचाकी लंपास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

निवृत्त प्राध्यापकांचे घर लक्ष्य; शिवकॉलनी परिसरात चोरट्यांचा हैदोस

आजरा | प्रतिनिधी

आजरा शहरातील शिवकॉलनी, गांधीनगर रोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे ४ ते सकाळी ११ या कालावधीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

चोरट्यांनी निवृत्त प्राध्यापक डॉ. नवनाथ शिंदे यांच्या घराला लक्ष्य करत तब्बल १४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर ऐवज लंपास केला. याप्रकरणी प्रकाश नवनाथ शिंदे (रा. शिवकॉलनी, गांधीनगर रोड, आजरा) यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंब काही कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली.

आणखी दोन घरांवर डल्ला

चोरट्यांनी परिसरातील आणखी दोन घरेही लक्ष्य केली.

  • युवराज जानबा जाधव यांच्या घरातून ९.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ तोळे चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली.
  • संजय यशवंत भोये यांच्या मालकीची सुमारे ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकलही चोरट्यांनी पळवून नेली.

श्वानपथक निष्फळ; दुचाकीवरून पसार झाल्याचा अंदाज

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते; मात्र चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. चोरी केलेल्या मोटारसायकलवरूनच आरोपी पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या धाडसी घरफोडीमुळे आजरा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous Post

चांदवड परिसरात पावसाची दमदार हजेरी; शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

Next Post

कॅकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाला वणीतील युवक-विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

कॅकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाला वणीतील युवक-विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In