• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
120
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

नांदवळ येथील एका तरुणाने पत्नीचे इतर व्यक्तीसोबत असलेले प्रेमसंबंध, मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाठार पोलीस ठाणे येथे मृत युवकाची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज सुभाष पवार (वय ३१, रा. नांदवळ, ता. कोरेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दि. १२ एप्रिल २०२६ ते १९ जून २०२६ या कालावधीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

धीरज यांच्या पत्नीचे गौरव राणे नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे त्यांना समजले होते. या कारणावरून गौरव राणे हा वारंवार धीरज यांना फोन करून शिवीगाळ करत असल्याचा तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप आहे.

तसेच धीरज यांच्या पत्नीने स्वतःच्या कर्जाचा हप्ता आणि तिच्या आईला दरमहा आर्थिक मदत करण्यासाठी धीरज यांच्यावर सतत दबाव टाकत मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या सर्व त्रासाला कंटाळून धीरज यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठीही आढळून आली असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी सुरज सुभाष पवार यांनी फिर्याद दिल्यानंतर पत्नी व गौरव राणे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयित आरोपी गौरव राणे याला कुडाळ येथून अटक केली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव करत आहेत.

Previous Post

किल्ले विशाळगडावर २७ जून रोजी ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा’ उत्साहात साजरा होणार

Next Post

वाळुंजनगर येथे शेतकऱ्यांना बाजरी बियाण्यांचे वाटप

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
102
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

वाळुंजनगर येथे शेतकऱ्यांना बाजरी बियाण्यांचे वाटप

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In