• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाडळी भिल्ल वस्तीतील 20 मुलांना शिक्षणाची नवी दिशा; एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा स्तुत्य उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

शिरूर कासार | प्रतिनिधी :
शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील भिल्ल वस्तीमध्ये घडलेल्या घटनेनंतर परिसरात सामाजिक आणि शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या होत्या. विशेषतः आदिवासी भिल्ल समाजातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर एकलव्य भिल्ल समाज संघटना यांनी पुढाकार घेत १८ ते २० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार शिरूर कासार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संघटनेने स्वतः पुढाकार घेत मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

RelatedPosts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

सुमित्राताई दशरथ पवार आणि अ‍ॅड. सूर्यकांत दशरथ पवार यांनी या मुलांच्या राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या मुलांना राजमाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केंद्रीय आदिवासी निवासी आश्रम शाळा, मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड येथे प्रवेश देण्यात आला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक सुभाष कोहक सर आणि विशाल मराठी सर यांच्या देखरेखीखाली मुलांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची व्यवस्था करण्यात आली असून, मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, अशी ग्वाही शाळा प्रशासनाने दिली आहे.

या उपक्रमामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांना नवजीवन मिळाले असून आदिवासी समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक बांधिलकी जपत उचललेले हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

“शिक्षण हीच खरी प्रगतीची वाट” या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवत एकलव्य भिल्ल समाज संघटना यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेले कार्य सर्व स्तरांतून कौतुकास्पद मानले जात आहे.

Previous Post

दीव गावातील ठाकूर आळीचा वीज प्रश्न सुटला; नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांना दिलासा

Next Post

श्रीरामपूरच्या आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
0
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
5
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
21
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
12
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
25
Next Post

श्रीरामपूरच्या आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In