• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गांधीनगर सोळसे तांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याअभावी रुग्णांचे हाल; रिपाइंकडून आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

अक्कलकोट, दि. २५ :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी अक्कलकोट तालुक्यातील गांधीनगर सोळसे तांडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत ७ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने दुधनी, भीमनगर, शिवाजीनगर, म्हेत्रे नगर तांडा तसेच सिन्नूर परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना उपचारासाठी गांधीनगर सोळसे तांडा येथील आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र येथे पिण्याच्या पाण्याचीच व्यवस्था नसल्याने रुग्ण, गरोदर महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

“रुग्णालय हे जीवनदायी केंद्र असते. तिथेच मूलभूत सुविधा नसणे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे,” अशी टीका सैदप्पा झळकी यांनी केली. दलित वस्ती सुधार योजनेतील निधीतून या समस्येचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

रिपाइंच्या वतीने रुग्णालयात तातडीने RO प्लांट, ५००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविणे तसेच कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, “७ दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तीव्र ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येईल,” असा इशारा रिपाइंकडून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहेत.

Previous Post

कन्नड तालुक्यात अखेर जोरदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Next Post

नागपूरला मिळाले धडाकेबाज पोलीस आयुक्त; विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
177
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

नागपूरला मिळाले धडाकेबाज पोलीस आयुक्त; विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In