• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्या त्वरित रद्द करा; भारतीय जनसंसदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 26, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

अहिल्यानगर प्रतिनिधी :

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये 12 जून 2026 रोजी करण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर दुरुस्त्या व नवीन तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात, या मागणीसाठी भारतीय जनसंसदेचे राज्य निमंत्रक अशोक सब्बन, जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे व सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्या मार्फत निवेदन दिले.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

निवेदनात माहिती अधिकार कायद्याच्या इतिहासाचा उल्लेख करत सांगण्यात आले की, माहिती अधिकार कायदा अस्तित्वात यावा यासाठी 10 ते 12 जुलै 1998 दरम्यान अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रातील पहिले उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला Anna Hazare, ग.प्र. प्रधान आणि बाबा आढाव यांनी भेट देत माहिती अधिकारासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्धार केला होता.

यानंतर देशभरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक आणि प्रशासनाच्या योगदानातून 11 मे 2005 रोजी माहिती अधिकार कायदा लोकसभेत, तर 12 मे 2005 रोजी राज्यसभेत मंजूर झाला. 15 जून 2005 रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर 12 ऑक्टोबर 2005 पासून देशभरात कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली.

मात्र, आता 20 वर्षांनंतर राज्य शासनाने 12 जून 2026 रोजी केलेल्या दुरुस्त्यांमुळे माहिती अधिकार कायद्याची धार बोथट होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नागरिकांना माहितीपासून दूर ठेवण्याचा आणि कायद्याच्या मूळ उद्देशालाच तिलांजली देण्याचा प्रयत्न होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

नवीन तरतुदींमध्ये माहिती मिळविण्याच्या शुल्कात वाढ, एका अर्जासाठी अतिरिक्त आर्थिक अटी, “एक विषय – एक अर्ज” ही अट, अपील शुल्क, ओळखपत्र सक्ती, सुनावणीला गैरहजर राहिल्यास अपील फेटाळण्याची तरतूद आणि अर्जदाराच्या मृत्यूनंतर प्रकरण बंद करण्याचा नियम यांचा समावेश असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच माहिती अधिकार कायद्याच्या कलम ६(२) नुसार अर्जदाराला माहिती मागण्याचे कारण विचारता येत नसताना ओळखपत्र सक्ती करणे हे कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आला आहे. नियम 20(3) अंतर्गत अपीलकर्ता किंवा तक्रारदाराला वकील नियुक्त करता येणार नसल्याची तरतूदही अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार हा संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मान्य केला असून माहिती मिळविण्याच्या प्रक्रियेत अनावश्यक आर्थिक व प्रशासकीय अडथळे निर्माण करणे हे घटनाविरोधी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

या दुरुस्त्यांमुळे “माहिती देणे हा नियम आणि नाकारणे हा अपवाद” हा कायद्याचा मूळ आत्माच बदलून जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या नियमांबाबत कोणतीही व्यापक सार्वजनिक चर्चा न करता निर्णय घेण्यात आल्याने लोकशाही प्रक्रियेलाच धक्का बसल्याचा आरोपही करण्यात आला.

शासनाने या तरतुदी तातडीने रद्द कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा अशोक सब्बन, पोपटराव साठे, रईस शेख, वीरबहादूर प्रजापती, अशोक भोसले, सुनिल टाक, विजय शिरसाठ, जालिंदर बोरुडे, अशोक डाके, बहिरनाथ वाकळे, शाकीर शेख, शिवाजी बेलोटे, शेख अल्ताफ, ज्ञानदेव चांदणे, प्रा. सुभाष कडलग, बबलू खोसला, राजू वैराळ, विनायक गोरखे, कांतीलाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी दिला आहे.

Previous Post

७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात; चाळीसगावात खळबळ

Next Post

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
177
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In