• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरजगाव परिसरातील मुसळधार पावसात एकाचा मृत्यू; दुसऱ्याचा शोध सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
68
VIEWS
Ad 1

शिरजगाव कसबा | प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिरजगाव कसबा परिसरात दि. २९ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्दैवी घटना घडली असून पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन जणांपैकी एकाचा मृतदेह आढळून आला आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचा शोध अद्याप सुरू आहे.

RelatedPosts

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सायंकाळी पाचनंतर अधिक तीव्र रूप धारण केले. विजांचा कडकडाट आणि सततच्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता. शिरजगावातील मेगा नदीसह सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे परिसरातील वाहतूकही काही काळासाठी ठप्प झाली होती.

दरम्यान, शिरजगावलगतच्या पांढरी गावातील दोन व्यक्ती पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली.

या शोधमोहीमेदरम्यान शिरजगाव ते ठूगाव मार्गावरील चालगळ नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव राणू आवारे असे असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असून प्रशासनाकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

या घटनेमुळे पांढरी गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

शिरजगाव कसबा परिसरात पावसाचा धुमाकूळ; दोन जण वाहून गेल्याची भीती

Next Post

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; शैक्षणिक साहित्याचे वाटप

Related Posts

Blog

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 14, 2026
1
Blog

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

August 14, 2026
2
वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 14, 2026
2
Blog

अंजनवाडी येथील जन्म नोंदणीबाबत हरकत नोंदविण्याचे आवाहन

August 14, 2026
6
डेगवे येथे पिंपळाचे झाड कोसळले; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
Blog

डेगवे येथे पिंपळाचे झाड कोसळले; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

August 14, 2026
11
Blog

ग्रामपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास तुर्तास स्थगिती:

August 14, 2026
4
Next Post

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; शैक्षणिक साहित्याचे वाटप

ताज्या बातम्या

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

August 14, 2026
दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

August 14, 2026
राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In