• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ख्रिस्ती बांधवांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रशासनाच्या भूमिकेविरोधात बसपाचे दीपक जाधव आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी

दोडामार्ग येथील ख्रिस्ती बांधवांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू असून, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आंदोलनस्थळी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलन सुरू होऊन तीन दिवस उलटूनही महसूल विभागाचा एकही जबाबदार अधिकारी उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी न आल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

RelatedPosts

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव दीपक जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “तीन दिवस उलटून गेले तरी महसूल विभागाचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकलेला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासन एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे की त्यांना उपोषणकर्त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ मिळत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांवरही टीका केली. “निवडणुकीच्या काळात मतांसाठी वारंवार जनतेच्या दारात येणारे पुढारी आता कुठे गेले आहेत? ते फक्त पुढील निवडणुकीची वाट पाहत आहेत का?” असा टोला त्यांनी लगावला.

ख्रिस्ती बांधवांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करताना दीपक जाधव म्हणाले, “आम्ही अल्पसंख्यांक असल्यामुळे आम्हाला या देशात न्याय मिळणार की नाही, हे प्रशासनाने स्पष्ट करावे.”

तसेच प्रशासनाने तातडीने आंदोलनाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधावा, अन्यथा बसपा अधिक आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. “जर प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आंदोलनस्थळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रशासन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढणार की आंदोलन आणखी चिघळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Dipak Jadhav
Previous Post

चांदीच्या ब्रेसलेटसाठी विवाहितेचा छळ; पतीविरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

Next Post

नेर डाकघरातील उद्धट वागणुकीमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये संताप

Related Posts

ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
24
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
71
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
59
Next Post

नेर डाकघरातील उद्धट वागणुकीमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये संताप

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजावर वस्ती या ठिकाणी भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजावर वस्ती या ठिकाणी भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

August 16, 2026
सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्याची मागणी; ग्रामस्थांचे सांगोला पोलिसांना निवेदन

सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्याची मागणी; ग्रामस्थांचे सांगोला पोलिसांना निवेदन

August 16, 2026
भिवंडी मध्ये अनहैजेनिक फूडची पोलखोल .

भिवंडी मध्ये अनहैजेनिक फूडची पोलखोल .

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In