• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेर डाकघरातील उद्धट वागणुकीमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

नेर | प्रतिनिधी

नेर येथील डाकघर कार्यालयात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या उद्धट, असहकार्यपूर्ण आणि दुर्लक्ष करणाऱ्या भूमिकेमुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही चौकशी करण्यासाठी गेल्यास त्यांना समाधानकारक माहिती दिली जात नाही. “आम्हाला माहिती नाही”, “ऑनलाइन नंबरवर संपर्क साधा”, “आमच्याकडे वेळ नाही” किंवा “जे होईल ते करून घ्या” अशा प्रकारची उत्तरे मिळत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

ही समस्या केवळ शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांपुरती मर्यादित नसून बचत खातेधारक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक ग्राहक, विमाधारक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही अशाच अनुभवांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक जण निराश होऊन परत जात असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

विशेषतः वृद्ध व्यक्ती, महिला आणि शेतकऱ्यांना विविध योजनांबाबत माहिती मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने व स्पष्टपणे संवाद साधून आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन डाकघरातील ग्राहक सेवा सुधारावी, कर्मचाऱ्यांना नागरिकांशी नम्रतेने वागण्याच्या सूचना द्याव्यात तसेच विविध योजनांची माहिती सहज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

Tags: Atul Kambale
Previous Post

ख्रिस्ती बांधवांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रशासनाच्या भूमिकेविरोधात बसपाचे दीपक जाधव आक्रमक

Next Post

जळकोट बस आगार निर्मितीच्या हालचालींना वेग; राज्य परिवहन मंडळाकडे पाठपुरावा तीव्र

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post

जळकोट बस आगार निर्मितीच्या हालचालींना वेग; राज्य परिवहन मंडळाकडे पाठपुरावा तीव्र

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In