याप्रसंगी माजी सरपंच श्री आनंथा दाते यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले नंतर मुलांनी संगीत कवायत तसेच देशभक्तीपर गाण्यावर लेझीम सादर केले. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक केले. याप्रसंगी ज्यांनी शाळेसाठी जागा दिली ते मा. नामदेव दाते बाबा तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते नितीन दादा दंडवते हे होते उपस्थितीत सुभेदार बाबाजी पऱ्हाड सरपंच भाऊसाहेब किठे . बाळासाहेब दाते तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंथा लाळगे उपाध्यक्ष राहुल दंडवते मा अध्यक्ष सुभाषराव दाते जनार्धन भोरडे सोमनाथ चौधरी संदेश येवले विठ्ठल चौधरी सोमनाथ भोरडे अनेक मान्यवर कार्यक्रमाला सर्व पालक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शशिकांत बढे सर यांनी केले व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मालन गायकवाड मॅडम यांनी मानले.







