• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून रामनगर पोलीस स्टेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

वर्धा

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनच्या वतीने स्वाध्याय मंदिर, रामनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांनी सदिच्छा भेट देत रक्तदात्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत “रक्तदान हे जीवनदान असून प्रत्येक नागरिकाने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून नियमित रक्तदान करावे,” असे आवाहन केले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिरास पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लॉयर्स ब्लड बँक, वर्धा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एकूण ७१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तसंकलनाचे कार्य लॉयर्स ब्लड बँकेच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, लॉयर्स ब्लड बँकेचे अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवक तसेच सर्व रक्तदात्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी, सहकार्य करणाऱ्या संस्था व रक्तदात्यांचे रामनगर पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या वेळी पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Shankar Panbude
Previous Post

घोराड येथे ऑटोचा टायर फुटल्याने अपघात; महिला गंभीर जखमी

Next Post

उमरी ठाण्यातील ‘व्हायरल’ दोन पोलीस कर्मचारी निलंबित

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post

उमरी ठाण्यातील ‘व्हायरल’ दोन पोलीस कर्मचारी निलंबित

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In