• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मांडवी एक्सप्रेसमधून धावत्या रेल्वेतून उडी; महिलेचा मृत्यू, पुरुष व दीड वर्षांचे बालक गंभीर जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

खेड | प्रतिनिधी

मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ घडली. या घटनेत शुभ्रा अतिश दिवेकर यांचा जागीच मृत्यू झाला असून सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांच्यासोबत असलेले दीड वर्षांचे बालक गंभीर जखमी झाले आहे. दोघांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

प्राथमिक माहितीनुसार, तिघेही मांडवी एक्सप्रेसने प्रवास करत होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मेटे गावाच्या हद्दीत रेल्वे धावत असताना त्यांनी अचानक गाडीतून उडी मारली. मुसळधार पावसात घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुभ्रा दिवेकर यांना तपासून मृत घोषित केले.

सचिन सत्यवान जुवळे आणि दीड वर्षांच्या बालकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कारणातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, खेड पोलीस आणि रेल्वे पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, शुभ्रा दिवेकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Tags: Vikram Pandit
Previous Post

आजच्या उच्चशिक्षित तरुण-तरुणींची मानसिकता आणि स्वावलंबनाची गरज

Next Post

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचरा टाकणे व जाळणे तात्काळ बंद करा

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
4
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
10
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
29
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
59
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
36
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
21
Next Post

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचरा टाकणे व जाळणे तात्काळ बंद करा

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In