• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोविंदपूर येथे श्री संत गजानन महाराज पालखीच्या महाप्रसादासाठी शिधा संकलनास प्रारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

गोविंदपूर | प्रतिनिधी

शेगाव ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या श्री संत गजानन महाराज पालखीचे कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे यंदाही पारंपरिक उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. दि. १३ जुलै २०२६ (सोमवार) रोजी सकाळी ११ वाजता सुमारे ७०० वारकरी, अश्व आणि वाहनांच्या ताफ्यासह पालखीचे गोविंदपूर येथे आगमन होणार असून, या निमित्ताने महाप्रसादासाठी शिधा संकलनास प्रारंभ झाला आहे.

RelatedPosts

पहिल्याच पावसात खात–पांजरा मुख्य रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

पाडशिंगीतील शेतकऱ्यांची निकृष्ट सोयाबीन बियाण्याविरोधात कारवाईची मागणी; चौकशी व भरपाईची मागणी

स्थगिती म्हणजे माघार नव्हे; माहिती अधिकाराच्या लढाईत अंतिम विजय अजून दूर

गोविंदपूर येथे दरवर्षी पालखीचा दुपारचा मुक्काम होत असल्याने पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांसह दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने धान्य व इतर जीवनावश्यक शिधा संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे.

या सोहळ्यास गोविंदपूरसह बोरगाव (बु.), देवधानोरा, खामसवाडी, माळकरंजा, बोरवंटी, जवळा, एकुरका, नागझरवाडी आणि परिसरातील अनेक गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतात. त्यामुळे महाप्रसादाची तयारीही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

पालखी सोहळ्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, उपाध्यक्ष मधुकर मिसाळ, खजिनदार वसंत जाधव तसेच सदस्य चंदुलाल मुंडे, विष्णू ढोबळे, तुकाराम सौदागर, कुंडलिक माळी, मधुकर कोळी, सिद्धलिंग बिडवे, बापू बिडवे, बालाजी माळी, सायसराव मुंडे, साहेबराव होनमाने, माऊली मुंडे, अण्णा पाटोळे, रामहरी मुंडे, सुधाकर पांचाळ, हिरालाल मुंडे, लालासाहेब माळी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.

या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन गोविंदपूर पालखी समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Avinash Sawant
Previous Post

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

Next Post

श्रीगोंदा–पेडगाव रोडवरील जुना शेतरस्ता खुला; शेतकऱ्यांना दिलासा

Related Posts

Blog

पहिल्याच पावसात खात–पांजरा मुख्य रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

July 7, 2026
0
Blog

पाडशिंगीतील शेतकऱ्यांची निकृष्ट सोयाबीन बियाण्याविरोधात कारवाईची मागणी; चौकशी व भरपाईची मागणी

July 7, 2026
3
Blog

स्थगिती म्हणजे माघार नव्हे; माहिती अधिकाराच्या लढाईत अंतिम विजय अजून दूर

July 7, 2026
0
Blog

रेड अलर्टचा इशारा: रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सर्व शाळा–महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

July 7, 2026
2
Blog

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्साहात वृक्षारोपण; विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

July 7, 2026
0
Blog

ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुरांडा गावातील रस्त्यांची दुरवस्था; चिखल व साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त

July 7, 2026
3
Next Post

श्रीगोंदा–पेडगाव रोडवरील जुना शेतरस्ता खुला; शेतकऱ्यांना दिलासा

ताज्या बातम्या

भातकुली तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कृती समितीची बैठक संपन्न

July 7, 2026

सेवापूर्ती निमित्त सहाय्यक शिक्षक देवानंद पाटील यांचा सपत्नीक सत्कार

July 7, 2026

पहिल्याच पावसात खात–पांजरा मुख्य रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

July 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In