• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आळंदी म्हातोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानोबा माऊली शंकर शिवरकर यांची बिनविरोध निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 20, 2026
in Blog
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

आळंदी म्हातोबा | प्रतिनिधी

आळंदी म्हातोबा येथील श्रीनाथ म्हातोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानोबा माऊली शंकर शिवरकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या विशेष सभेत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

नवनियुक्त चेअरमन ज्ञानोबा माऊली शिवरकर यांच्या निवडीबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती मनीषाताई शंकर नानासाहेब पदे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप नाना वाल्हेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अध्यक्ष भगवान अण्णा जवळकर, अशोक भाऊ जवळकर, अरविंद शिवरकर, सोसायटीचे सचिव विवेक ठोंबरे, निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली देसाई तसेच पंचायत समिती हवेलीचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त चेअरमन व संचालक मंडळाला शुभेच्छा देत संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि सोसायटीची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त चेअरमन ज्ञानोबा माऊली शंकर शिवरकर यांनी, “शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे, विविध कर्ज योजनांचा लाभ तळागाळातील सभासदांपर्यंत पोहोचविणे तसेच संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करणे हीच आपली प्रमुख प्राथमिकता असेल. सर्वांना सोबत घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी कटिबद्धपणे काम करू,” अशी ग्वाही दिली.

या निवड प्रसंगी गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी, सोसायटीचे संचालक, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानोबा माऊली शंकर शिवरकर यांच्या बिनविरोध निवडीबद्दल आळंदी म्हातोबा परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

देवपूर शिवारात जुगार अड्ड्यावर धाड; ७ जणांवर कारवाई, ₹६,१५० चा मुद्देमाल जप्त

Next Post

राजेवाडी येथे संत निरंकारी मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

राजेवाडी येथे संत निरंकारी मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In