रत्नागिरी : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण समारंभ उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना देत सन्मानपूर्वक सलामी दिली. राष्ट्रध्वज फडकविण्यात आल्यानंतर उपस्थित अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.
या समारंभास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्यासह रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक कार्यालयात देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले होते.









