• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणीत पालकमंत्र्यांना काळे झेंडे; रिपब्लिकन सेनेचा निषेध

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
परभणीत पालकमंत्र्यांना काळे झेंडे; रिपब्लिकन सेनेचा निषेध
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

“शासकीय नेत्र रुग्णालय व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील प्रकरणांच्या चौकशीची मागणी; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा”

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

परभणी स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित असताना रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शासकीय नेत्र रुग्णालयातील प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच गंगाखेड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कथित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, या मागण्यांसाठी उपोषण करणारे वामनराव राठोड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने संबंधित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
रिपब्लिकन सेनेने आपल्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमादरम्यान झालेल्या या निषेध आंदोलनामुळे प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आता रिपब्लिकन सेनेच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासन व संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात आणि चौकशीबाबत पुढील निर्णय काय होतो, याकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

श्री संत बाळगीर महाराज हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Next Post

मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
37
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
9
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
8
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
21
Next Post
मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In