• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; दिमाखदार ‘तिरंगा रॅली’ने वेधले लक्ष.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
शहादा येथे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; दिमाखदार ‘तिरंगा रॅली’ने वेधले लक्ष.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१६
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या विविध ज्ञानशाखांचा संयुक्त मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.
मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या पटांगणावर ध्वजारोहण करण्यात आले. या मुख्य कार्यक्रमास परिसरातील नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती.ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यानंतर काॅलेज ते लोणखेडा गावातील परिसराचे भाग्यविधाते कै. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या स्मारक स्थळापर्यंत भव्य ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. हातात राष्ट्रध्वज घेऊन आणि देशभक्तीपर घोषणा देत निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगवून टाकला होता.या तिरंगा रॅलीमध्ये शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील,

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

भाजपचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील यांच्यासह शहादा नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक व सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल, प्राचार्य आर. एस. पाटील, प्राचार्या कीर्ती महाडिक, प्राचार्य बी. के. सोनी यांच्यासह एन.एस.एस. (राष्ट्रीय सेवा योजना) आणि एन.सी.सी. च्या पथकांनी विशेष परिश्रम घेऊन उत्कृष्ट नियोजन केले.

Previous Post

ट्रॅकचालकाचा देश प्रेमाचा अंदाज ;

Next Post

गॅस वितरणातील अतिरिक्त शुल्क व कथित अनियमिततेबाबत ग्राहकांचा सवाल

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
37
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
7
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
8
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
21
Next Post

गॅस वितरणातील अतिरिक्त शुल्क व कथित अनियमिततेबाबत ग्राहकांचा सवाल

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In