• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

“प्रभात फेरी, गणवेश वाटप, वृक्षारोपण आणि बक्षीस वितरणाने देशभक्तीचा जागर”

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

मानवत शहरामध्ये १५ ऑगस्ट रोजी देशाचा स्वातंत्र्य दिन विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये अत्यंत उत्साहात, आनंदी आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रभात फेरी, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा
शाळेत मुख्याध्यापिका नवरस जहा मोहम्मद कलीम यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.
प्रभात फेरी व सांस्कृतिक कार्यक्रम
विद्यार्थ्यांनी महापुरुष व देशभक्तांच्या विविध वेशभूषा परिधान करून शहरातून आकर्षक प्रभात फेरी काढली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व समूहगीते सादर केली.
•उपस्थिती: या वेळी रेश्मा मॅडम, कौसर मॅडम, शमीम मॅडम, रोहीना मॅडम, तनवीर खान सर, सलीम बागवान सर, नदीम चौधरी, पत्रकार रियाज शेख, वाजेद बेलदार, जब्बार बागवान, अखील बागवान, शेख नवीद यांच्यासह शिक्षक, पालक व नागरिक उपस्थित होते.

के. के. एम. महाविद्यालय
के. के. एम. महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम पार पडले.
गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप: मानवत अर्बन बँक, सांगली अर्बन बँक, महेश पतसंस्था आणि विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या प्रसंगी बालकिशन चांडक, विजयकुमार दलाल, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे व इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शारदा राऊत यांनी केले, तर आभार डॉ. विनायक जाधव यांनी मानले.
•वृक्षारोपण व प्रश्नमंजुषा स्पर्धा: राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते दिशा पाईकराव (प्रथम), अनिल चौरे (द्वितीय), चैतन्य कोक्कर व वैष्णवी गाते (तृतीय) यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पी. एम. श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात प्रादेशिक मापदंड ठरलेल्या या आदर्श शाळेत मुख्याध्यापक माणिक घाटुळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
•उपस्थिती: या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलासराव बारहाते, सदस्य संदीप पवार, श्रीराम पक्वान्ने, रामभाऊ गोलाईत यांच्यासह शिक्षक, पालक आणि सुमारे दीड हजार विद्यार्थी उपस्थित होते.

नेताजी सुभाष विद्यालय
नेताजी सुभाष विद्यालयात मुख्याध्यापक एस. जी. लाड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
•भव्य प्रभातफेरी: ध्वजारोहणानंतर विद्यालयाच्या वतीने शहरातून भव्य आणि शिस्तबद्ध प्रभातफेरी काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन आणि विविध देशभक्तीपर वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी शहराचे लक्ष वेधून घेतले.
•उपस्थिती: कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक जी. एस. सिखवाल, केशव शिंदे, अंबादास बंडे, पी. बी. पुरी, पडघन सर, रमेश मुलगीर सर, अलका सोरेकर, कमल पाटील, ओंकार इंगोले यांच्यासह अशोक काळे, ज्ञानेश्वर कौसाईतकर, शिवाजी रणवीर, गणेश सिरसकर, शेषराव ढगे, एम आर शेख, अनिता पतंगे, सदाशिव होगे, संजय जाधव, दत्तराव आधाटे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवत शहरातील सर्वच शिक्षण संस्थांमध्ये पार पडलेल्या या विविध कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मानवत तहसील येथे ध्वजारोहण
माननीय तहसीलदार पांडुरंग माचेवाड साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण उपस्थित कोमल सावरे मॅडम तसेच संजय खिलारे तसेच तहसील सर्व कर्मचारी उपस्थित होते
नगरपरिषद मानवत येथे ध्वजारोहण
मानवतेतील नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी कोमल सावरे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित नगराध्यक्षा राणीताई अंकुश भाऊ लाड उपनगराध्यक्ष अंकुश लाड व तसेच सर्व नगरसेवक तसेच नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

गॅस वितरणातील अतिरिक्त शुल्क व कथित अनियमिततेबाबत ग्राहकांचा सवाल

Next Post

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
13
Next Post
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In