• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

​आजरा (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी
येथील जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दुरदुंडेश्वर कार्यालय (वाणी गल्ली, आजरा) येथे उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत सभासदांसाठी १०% लाभांश जाहीर करण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह सर्व विषयांना एकमुखाने मंजुरी देण्यात आली.

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

​सभेची सुरुवात मान्यवर चेअरमन व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सभासद व ग्राहकांना ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि सायबर सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रारंभी संचालक विक्रम देसाई यांनी स्वागत करून दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजलीचा ठराव मांडला.
​बँकेचे चेअरमन श्री. मुकूंददादा देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बँकेच्या सभासदांच्या १० वी, १२ वी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत पाल्यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. बी. पाटील यांनी ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढील अहवाल वाचन केले.

​अहवाल वाचनावेळी ज्येष्ठ सभासद श्री. बाबासाहेब देवकर (रा. कोल्हापूर), श्री. तानाजी देसाई (रा. पेरणोली) व श्री. आनंदा पाटील (रा. मुरगूड) यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत चेअरमन, संचालक मंडळ व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडला. तसेच कर्मचाऱ्यांची पदोन्नती, पगार स्केल आणि ताळेबंदाबाबत विचारलेल्या प्रश्नांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. बी. पाटील यांनी सविस्तर उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. चेअरमन यांनी मांडलेल्या १०% लाभांश मंजुरीच्या प्रस्तावास सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने संमती दिली. सभेचे आभार श्री. संतोष पाटील यांनी मानले.

​या सभेस बँकेचे चेअरमन श्री. मुकूंददादा देसाई, व्हाईस चेअरमन श्री. अमित सामंत, संचालक सर्वश्री महादेव टोपले, जयवंत शिंपी, रणजित देसाई, बाबाजी नाईक, जयवंत कोडक, शशिकांत नार्वेकर, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई, सौ. रेखा देसाई, सौ. नंदा केसरकर, महेश कांबळे, पांडुरंग तोरगले, संतोष पाटील, तज्ज्ञ संचालक ॲड. एस. एस. निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. बी. पाटील, असिस्टंट मॅनेजर श्री. पी. ए. सरंबळे, सिनियर ऑफिसर श्री. माणिक सावंत, श्री. सुहास चौगुले यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.

Next Post

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
37
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
7
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
8
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
21
Next Post
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In