प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
बेस्ट आर्टिस्ट’ चा मान मिळाल्याने कला क्षेत्रात परभणीचे नाव उजळले
परभणी:-कलेच्या साधनेतून सातत्याने मेहनत करणाऱ्या परभणीच्या ग्रामिण मातीत कसलेल्या कलाकाराला अखेर राष्ट्रीय व्यासपीठावर जागतीक पुरस्काराचा सन्मान मिळाला आहे. मुंबईतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे कला कोनेट संस्थेच्या वतीने आयोजित जागतिक ग्रुप चित्रप्रदर्शनात परभणीचे चित्रकार सुशिलकुमार एन. घुंबरे यांना “बेस्ट आर्टिस्ट – राजा रवी वर्मा अॅवार्ड” ने रविवारी १६ ऑगष्टरोजी सायंकाळी मुंबई येथील वरळीच्या नेहरू आर्ट गॅलरीत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हे प्रदर्शन ११ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भरले होते. यात देश-विदेशातील ९४ कलाकारांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून पुरस्कारासाठी १० कलाकारांची निवड करण्यात आली. या निवड यादीत परभणीच्या मातीतील कलाकार सुशिलकुमार घुंबरे यांनी बाजी मारली.
“कलम नाही, ब्रश आहे हाती… आणि आज त्याच ब्रशला मिळाला मानाचा मान!”
या शब्दांत कुटुंबीयांनी त्यांच्या या यशाचे वर्णन केले.
कला कॉनेट च्या या जागतिक व्यासपीठामुळे नवोदित आणि प्रस्थापित कलाकारांना एकत्र येण्याची संधी मिळाली. परीक्षकांनी घुंबरे यांच्या चित्रांमधील विषयाची खोली, रंगसंगती आणि तंत्रातील प्रगल्भता याचे विशेष कौतुक केले.
या सन्मानाबद्दल बोलताना घुंबरे म्हणाले, “तुलिकेतून उतरते जेव्हा स्वप्नांची वारी, कॅनव्हासवर फुलते कलाकाराची कहाणी. मेहनत बोलते तेव्हा सन्मान झुकतो. आज नेहरू सेंटरमध्ये तेच अनुभवायला मिळाले.”
या यशानंतर २१ ऑगस्ट रोजी मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे होणाऱ्या विशेष कला कार्यक्रमात त्यांचा पुन्हा एकदा सन्मान होणार आहे.
कला कोनेट आणि प्रदर्शनाच्या संपूर्ण टीमचे आयोजकांनी आभार मानले.
या यशामुळे परभणी जिल्ह्याच्या कला क्षेत्राला नवी उभारी मिळाली असून, आगामी कलाकारांसाठी हा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.










