मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे, सारथी महाराष्ट्राचा न्यूज . 🖊️…………………. मारेगाव, तालुक्यात येत असलेल्या ग्राम चिंचोली बोटोनी सर्कल मधील. ग्राम सराटी गावालगत असलेल्या सोनू पोढाच्या चौफुलीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ एका शेतामध्ये गाई ढोरनाचा दाखवून व शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारूचा साठा लपवून ही दारू विक्री याच गोठ्यातून केली जात असल्याचा प्रकार प्रत्यक्ष सोनू पोढlतील तसेच सराटी येथील नागरिकांनी माहिती दिली आहे, या दारुमुळे कित्येकांचे संसार उध्वस्त झाले आहे त्याचप्रमाणे लहान लहान मुले दारू पिण्यास शिकले आहे आणि स्त्रियांना व शाळकरी मुलींना या अवैध दारूमुळे अत्यंत त्रास होत असल्याचा प्रकार समोर आला आहे विशेष जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला ही अवैद्य दारू विकल्या जाते तरीसुद्धा प्रशासन आंधळे बनवून का गप्प बसले आहे . असा प्रश्नचिन्ह स्थानिक नागरिकांनी आपल्या शब्दात कथित केला आहे. या अवैध दारू विक्रीवर त्वरित आडा घालून योग्यरीत्या कारवाई व्हावी अशी संपूर्ण नागरिकांची प्रशासनाकडे मागणी आहे. प्राप्त माहितीनुसार.









