प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-येथील कुरुंदवाड रोटरी क्लब कुरुंदवाड यांच्याकडून रोटरी डिस्ट्रिक्ट ग्रँट मधून 4 स्मार्ट LED टी व्ही सेट मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता कन्या विद्या मंदिर नं.1 ( पोस्ट ऑफिस समोर) शाळेस एक लाख रुपयांचे स्मार्ट टीव्ही प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत रोटे शिवाजी बाबर यांनी केले.प्रास्तावना व पाहुण्यांचा परिचय मावळते अध्यक्ष शैलेश व्होरा यानी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन व विश्वशांतीसाठी स्तब्ध राहून प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटे. इंजि. अरुण भंडारे यांच्या हस्ते स्मार्ट टीव्ही संच प्रदान करण्यात आला.
यावेळी रोटे. हर्षवर्धन फडणीस आपल्या भाषणात म्हणाले की,मी गेली 27 वर्षे यशस्वी रित्या कारकीर्द पार पाडली आहेत. ही शाळा 150 वर्षाची असल्याची सांगून या स्वातंत्र्य पूर्व काळातील जुनी शाळा आहे. AI चा उपयोग शाळेत मुलींना शिक्षणासाठी करावा.जेणेकरून शिक्षणात प्रगती साधता येईल.
कुरुंदवाडच्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. मनिषाताई डांगे म्हणाल्या की, सद्या श्रावण महिना सुरु असून लोक देवाच्या महाप्रसादाला भरपूर देणग्या देतात.पण ज्या मंदिरात लहान मुलांना देवपन घडवतात त्यांना मात्र देणगी का देत नाही हे एक न उलघडणार कोड आहे.
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की माझे संपूर्ण शिक्षण प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेतच घेतले आहे. मराठी शाळा आता खाजगी शाळेपेक्षा सरस होत आहेत. स्मार्ट टी.व्ही तुन शिक्षण घेणे अनिवार्य झाले आहे.
रोटे. इंजि. अरुण भंडारे. यांनी आपले विचार व्यक्त केले की, मराठी शाळेत सर्व सामान्यांची मुले शिक्षण घेऊन यशस्वी होत येत, कोणत्याही क्षेत्रात महिलांना देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत एक मुलगी शिकली की कुटुंब शिकत, एक कुटुंब शिकले की राष्ट्र शिक्षित होते म्हणून मुलींनी शिक्षण घेणे आवश्यक आहे.
सदर कार्यक्रमात गव्हर्नर रोटे यांनी कार्याचा आढावा घेताना सांगितले की या आधी 75 लाख रुपये वितरित केले होते. तर रोटरी क्लबने चालू वर्षी 1 कोटी 32 लाख रुपये वितरित करण्यात येत असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमास रोटरी क्लब कुरुंदवाडचे रो. डॉ. संदीप गायकवाड. रोटे. प्रशांत पट्टेकरी, रोटे,अमित पाटील, रोटे,सचिन औरवाडे. रोटे. सुभाष जाफळे. रोटे. हिंदुराव तावदारे. रोटे. सोमनाथ सुतार. रोटे. उत्कर्ष, रोटे. विक्रम कडाळे. इत्यादी रोटरीचे सदस्य पदाधिकारी, तसेच शाळेच्या मुख्याध्यपिका, सर्व शिक्षिका विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. अनिकेतन पाटील यांनी केले तर आभार रोटरी क्लबचे सेक्रेटरी अमित पाटील यांनी मानले.








