प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-शिरोळ तालुक्यातील हेरवाड व शिरढोण या गावामध्ये गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा बरोबर आगामी होणाऱ्या गणेशोत्सव सणा मध्ये शांतता, राखण्यासाठी कोणकोणत्या उद्भवणाऱ्या समस्या जसे कर्कश आवाजाचे डॉल्बी लावणे, मिरवणुकीत दंगा करणे, मोठमोठ्या आवाजाचे फटाके फोडणे, पेंडोल (गणेश मंडपाजवळ)घ्यावयांच्या दक्षता. अशा अनेक समस्या जाणून घेणे यासाठी यांची बैठक घेतलेली आहे सदर बैठकीमध्ये गावामध्ये सर्व मंडळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केलेले आहे.
तसेच डॉल्बी मुक्त वातावरणात गणेश उत्सव पार पाडावा याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेले आहेत.
नागरिकांनी गणेशोत्सव सण व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी व गणेशोत्सव मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी यांनी शांतता, सुरक्षा आबादित राखण्यासाठी कोणतेही गालबोट लागता कामा नये यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनया बैठकी दरम्यान करण्यात आले.








