• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

सावर्डे विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम; ‘एक राखी जवानांसाठी’ अभियानातून देशप्रेमाची भावना जागृत
सावर्डे : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे ‘एक राखी जवानांसाठी’ प्रसार व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या २०० हून अधिक आकर्षक राख्या आणि १८० कृतज्ञतापत्रे जवानांसाठी तयार केली. एकूण ७५ लिफाफ्यांमधून ही राखी व पत्रे डाक विभागामार्फत सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पाठविण्यात आली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण व पर्यवेक्षक महेश कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी सावर्डे पोस्टमास्टर जगदीश महाडिक यांचे स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले. पोस्टल कर्मचारी व मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, चिपळूण विभागाचे आदित्य मयेकर यांचे स्वागत उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी, तर ब्रांच पोस्टमास्टर सत्यजित राजे शिर्के यांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण देशप्रेमाने भारावून टाकले. जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पत्रांचे वाचनही करण्यात आले. इयत्ता दहावी ब मधील स्वरा टक्के हिने मराठी, इयत्ता बारावीतील नेहा जाधव हिने इंग्रजी, इयत्ता दहावीतील रिफद काद्री हिने हिंदी, तर रिया सावंत हिने मराठी भाषेतील पत्राचे वाचन केले.
पोस्टल कर्मचारी आदित्य मयेकर यांनी विद्यार्थ्यांना डाक विभागाच्या कार्याची माहिती देत मार्गदर्शन केले. सावर्डे पोस्टमास्टर जगदीश महाडिक यांनी पोस्ट व टपालपेटीचे महत्त्व तसेच पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी जवानांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या त्यागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सीमेवर जवान अहोरात्र तैनात असल्यामुळेच देशातील नागरिक शांततेने जीवन जगू शकतात, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
या उपक्रमासाठी सत्यजित राजे शिर्के (दहिवली), दीपक चव्हाण (आगवे), संचिता चव्हाण (दुर्गेवाडी), अनया चव्हाण (पुरुष), अजिंक्य शिर्के (मुंडे), मानसी कदम (असुर्डे), सुधीर कांबळे (डेरवण) आणि ओंकार जगताप (मांडकी) या ब्रांच पोस्टमास्टर्सनी जवानांना राख्या व कृतज्ञतापत्रे पाठविण्याच्या स्पीड पोस्टच्या कामात सहकार्य केले.

सकाळच्या सत्रातील उपक्रमासाठी सौ. शिल्पा राजेशिर्के यांनी सर्व वर्गशिक्षकांच्या सहकार्याने काम पाहिले, तर दुपारच्या सत्रात सौ. अनुजा बागवे यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सौ. अनुजा बागवे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. अमृता घाग यांनी केले.
विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या व पत्रांच्या माध्यमातून सीमेवरील जवानांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता हा उपक्रम देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय भावनेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

Ad 1
Previous Post

देवस्थानालगत अवैध दारूच्या विक्रीचा प्रकार उघडकीस

Next Post

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
4
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
3
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
1
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
26
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
7
Next Post
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In