• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबमध्ये ‘शहीद भगतसिंग’ क्रीडा संकुल उभारण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्याची NSUIची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

कळंब | प्रतिनिधी

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) तालुका कळंबच्या वतीने कळंब तहसीलदारांना निवेदन देऊन शहरात ‘शहीद भगतसिंग’ क्रीडा संकुल उभारण्यासह शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्याची मागणी करण्यात आली.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कळंब तालुक्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक पोलीस तसेच लष्करी भरतीची तयारी करीत आहेत. याशिवाय क्रिकेटसह विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी व क्रीडाप्रेमीही मोठ्या संख्येने आहेत. मात्र, शहरात अद्याप सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध नसल्याने खेळाडू व भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे NSUIने निवेदनात म्हटले आहे.

कळंबच्या आसपासच्या अनेक तालुक्यांच्या ठिकाणी भव्य क्रीडा संकुले उपलब्ध असताना कळंब शहरात सुसज्ज क्रीडा संकुल का नाही, असा सवालही संघटनेने उपस्थित केला. त्यामुळे स्थानिक युवक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींसाठी ‘शहीद भगतसिंग’ यांच्या नावाने सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

यासोबतच कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. कर्जमाफीबाबत सातत्याने मुदतवाढ व प्रतीक्षा सुरू असून, कोणाचे नाव लाभार्थी यादीत आहे तर कोणाचे नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे NSUIने म्हटले आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून शासनाने पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.

क्रीडा संकुलाच्या कामाचे आदेश दोन महिन्यांच्या आत जारी करावेत, अन्यथा NSUIच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष शुभम पिसे यांनी दिला.

यावेळी करण वानखेडे, बबलू वाघमारे, महादेव भिसेकर, समीर आडे, शुभम शेंडे, अंकुश शिंदे, विवेक दीडपाये, कुणाल खीरकर यांच्यासह NSUIचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान दाखल

Next Post

विद्येश्वर महादेव मंदिराची कावड यात्रा उत्साहात संपन्न

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

विद्येश्वर महादेव मंदिराची कावड यात्रा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In