• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपरी-चिंचवड हादरले! हुंडाबळी प्रकरणातील शिल्पा गवारे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना कठोर कारवाईची ग्वाही

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे:
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची शाई वाळत नाही तोच, पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातून आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. हुंडाबळीच्या आरोपांनी संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हादरले असून, शिल्पा गवारे यांच्या शंकास्पद मृत्यूने पुन्हा एकदा हुंडाबळीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत शिल्पा यांच्या कुटुंबीयांना थेट फोनवरून मोठा दिलासा दिला असून, हे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.
मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना मोठी ग्वाही
शिल्पा गवारे या पिंपरी-चिंचवडच्या भाजप नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या नणंद होत्या. रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि शिल्पाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना कठोर शिक्षा मिळवून देण्याची मागणी केली. वाकड परिसरात अल्पावधीत अशा दोन धक्कादायक घटना घडल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास वेगवान करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविला जाईल आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.
माहेरच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप
शिल्पा गवारे यांच्या मृत्यूस सासरच्या मंडळींचा अनन्वित छळ आणि हुंड्याची न संपणारी भूक कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. लग्नापासूनच पती सचिन गवारे, सासरे उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे यांच्याकडून शिल्पा यांना सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता.

कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, मुलीच्या संसारासाठी माहेरच्यांनी दोन एकर जमीन, पतीच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत आणि वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम दिली. मात्र, तरीही सासरच्या मंडळींचा पैशांचा हव्यास कमी झाला नाही आणि याच लालसेपोटी शिल्पा यांचा घातपात करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पतीसह चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या असून, ही ‘आत्महत्या नसून घातपात आहे का?’ या दिशेने आता पोलीस तपासाला तीव्र वेग आला आहे.

Ad 1
Previous Post

मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

Next Post

रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर शहर कार्यालयात स्नेहबंधाचा अनोखा उत्सव.!

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
8
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
7
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
16
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
10
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
16
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
Next Post
रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर शहर कार्यालयात स्नेहबंधाचा अनोखा उत्सव.!

रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर शहर कार्यालयात स्नेहबंधाचा अनोखा उत्सव.!

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In