धुळे – येथील एस् व्ही के एम् सीबीएसई स्कूल मधील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आर्यन सुजितकुमार बाविस्कर याने एशियन शाॅर्ट ट्रॅक ट्राॅफी २०२६ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याची वृत्तपत्रांतील बातमी वाचून अत्यंत आनंद व अभिमान वाटल्याने राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी त्यास आपल्या निवासस्थानी बोलावून अभिनंदन पत्र, गौरव पत्र व रोख बक्षीस रुपये पाचशे मात्र देऊन सन्मानित केले.आणि पुढील वाटचाल व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम शुभ आशीर्वाद दिले.
आर्यन व त्याचे कुटुंबीय यांनी भावसार सरांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले .
भावसार सरांनी आजपर्यंत तब्बल ११०० अकराशे यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव केल्याबद्दल शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त करुन धन्यवाद दिले आहेत.






