• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न…!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न…!
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

सुरेंद्र सोनवणे, लोणी प्रतिनिधी :–धामणी (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान मंदिरात श्रावण पौर्णिमेनिमित्त भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, भंडाऱ्याची उधळण आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात श्री खंडोबा-बाणाईचा पारंपरिक शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

श्रावण पौर्णिमेच्या पहाटे श्री खंडोबा मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अकरा जोडप्यांच्या हस्ते विधिवत रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, शांताराम भगत, राजेश भगत, नामदेव भगत, अनिरुद्ध वाळूंज यांच्यासह महिला भाविकांनी सप्तशिवलिंग तसेच श्री खंडोबा-बाणाईच्या पंचधातूच्या मुखवट्यांना चंदनऊटीचा लेप लावून धार्मिक विधी पार पाडले.

विवाह सोहळ्यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. खंडोबा-बाणाईच्या मुखवट्यांना आकर्षक वस्त्रालंकार, बाशिंग आणि मुंडावळ्या बांधून त्यांची विधिवत सजावट करण्यात आली. त्यानंतर वाद्यांच्या गजरात मुखवट्यांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सहा वाजता ही मिरवणूक मंदिरात दाखल झाली.

मंदिराच्या प्रांगणात महिलांनी नवरदेव खंडोबाच्या मुखवट्याचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर सनई, तुतारी आणि ढोलाच्या निनादात हिरवी साडी नेसवून अलंकारांनी सजवलेला बाणाईचा मुखवटा सेवेकरी मंडळींनी लग्नमंडपात आणला.

यानंतर मंगलाष्टकांना सुरुवात झाली. खंडोबा-बाणाईच्या मुखवट्यांवर फुलांच्या पाकळ्या, अक्षता आणि भंडारा उधळण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक धार्मिक विधींच्या साक्षीने खंडोबा-बाणाईचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. विवाहानंतर उपस्थित भाविक व वऱ्हाडी मंडळींना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे, पोपट भोजने, गणपत भोजने, गणेश जारकड आणि भाऊ भोजने यांनी केले. यावेळी सेवेकरी, मानकरी, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

दीपमाळ उभारणीच्या कामाला सुरुवात…

श्री खंडोबा मंदिराच्या दोन्ही महाद्वारांच्या बाजूला भव्य दगडी दीपमाळ उभारण्याच्या कामाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. आगामी चंपाषष्ठी उत्सवापूर्वी दीपमाळेचे काम पूर्ण करण्याचा मानस ग्रामस्थ व सेवेकरी मंडळींनी व्यक्त केला. त्यामुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून, भाविकांसाठी हे नवे आकर्षण ठरणार आहे.

Ad 1
Previous Post

नेपाळ देश कधीही परकीय सत्तेचा गुलाम किंवा वसाहत बनला नसल्यामुळे तिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही…

Next Post

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
3
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
2
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
1
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
1
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
22
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post
मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In