• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

शहादा,दि.०७
महाराष्ट्र राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग योजनेअंतर्गत शहादा शहरातील दादावाडी परिसरात पेवर ब्लॉक बसवणे व शहरातील विविध ठिकाणी रस्ते व विकासकामांचे भूमिपूजन शहादा-तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. धार्मिक व सामाजिक स्थळांच्या मूलभूत विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी आमदार पाडवी यांच्या पाठपुराव्यातून उपलब्ध झाल्याने जैन भाविक व शहादा शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

RelatedPosts

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न.

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.

मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

शहादा शहरामधील डोंगरगाव रस्त्यालगत असलेल्या श्री जीन कुशल सूरि संस्थानाच्या ‘सुघोषा घंटा दादावाडी’ परिसर भागात पेवर ब्लॉक बसवणे व नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. पेवर ब्लॉक बसवल्यामुळे दादावाडी परिसर स्वच्छ, सुबक व आकर्षक दिसणार असून दर्शनासाठी येणाऱ्या सकल जैन समाज बांधवांसाठी प्रसन्न वातावरण निर्माण होणार आहे.या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा प्राचार्य मकरंद पाटील, शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ.माधवी मकरंद पाटील, श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन रमेश चोरडिया, व्हाईस चेअरमन विनयचंद्र गांधी, पारस जैन, समतीलाल जैन, कचरूलाल नहाटा, प्रदीप नहाटा, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, बांधकाम सभापती संतोष वाल्हे, पाणीपुरवठा सभापती प्रदीप ठाकरे, नगरसेवक ललित छाजेड, सागर मराठे, महावीर पतसंस्थेचे चेअरमन समीर जैन, मोतीलाल जैन, भरत ओसवाल, दिलीप जैन, विनोद जैन यांच्यासह शहरातील राजकीय-सामाजिक कार्यकर्ते व सकल जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार राजेश पाडवी म्हणाले की, राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाकडून धार्मिक व सामाजिक कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शहादा-तळोदा मतदार संघात जास्तीत जास्त निधी आणून विकासकामांना गती देण्याला आमचे प्राधान्य आहे. अल्पसंख्यांक विभागाच्या दीड ते दोन कोटी रुपयांच्या निधीतून दादावाडी परिसरात पेवर ब्लॉक व नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून, यामुळे शहरातील धार्मिक व सामाजिक स्थळांचा कायापालट होण्यास मदत होईल.

Previous Post

श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!

Next Post

राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार राजेश माणिकराव ढोके यांना जाहीर; श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव

Related Posts

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न.
Blog

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न.

September 7, 2026
0
विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.
Blog

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.

September 7, 2026
0
मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी
Blog

मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

September 7, 2026
0
शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
Blog

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

September 7, 2026
4
पारोळ्याच्या ‘परिश्रम’ दिव्यांग निवासी शाळेत दहीहंडीचा उत्साह; बाल गोपाळांच्या थरांनी जिंकली मने!
Blog

पारोळ्याच्या ‘परिश्रम’ दिव्यांग निवासी शाळेत दहीहंडीचा उत्साह; बाल गोपाळांच्या थरांनी जिंकली मने!

September 7, 2026
0
मुलगा नसल्याची खंत नाही; मुलींनीच दिला वडिलांना अखेरचा खांदा
Blog

मुलगा नसल्याची खंत नाही; मुलींनीच दिला वडिलांना अखेरचा खांदा

September 7, 2026
5
Next Post
राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार राजेश माणिकराव ढोके यांना जाहीर; श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव

राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार राजेश माणिकराव ढोके यांना जाहीर; श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव

ताज्या बातम्या

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न.

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न.

September 7, 2026
विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.

September 7, 2026
मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In