विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका; शाळेचा कारभार एक दिवस विद्यार्थ्यांच्या हाती
कवठेमहांकाळ तालुका प्रतिनिधी :* श्री सिद्धेश्वर हायस्कूल जाखापूर येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या सर्व वर्गांवर शिकवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
या दिवशी शाळेचा संपूर्ण कारभार विद्यार्थ्यांनीच सांभाळला. मुख्याध्यापक म्हणून कु. श्रवण पाटील यांनी काम पाहिले. तर शिक्षक म्हणून उत्कर्षा पाटील, आदिती पाटील, वेदिका पाटील, अक्षदा पाटील, श्रेया साळुंखे, सृष्टी केंगार, अंतरा पाटील, स्नेहप्रभा माने, तनिष्का माळी, धनश्री वठारे, साक्षी बाबर, साक्षी केंगार, लिशा चव्हाण, आलिशा मुलाणी, प्रणाली घाडगे, गौरी बाबर, अक्षता जाधव, आरुषी पाटील, श्रद्धा शिंदे, अर्पिता माळी, सुजल पाटील, सोहन माळी, सोहम शिंदे, सोहम केंगार, ओंकार हातेकर, संस्कार घाडगे यांनी वेळापत्रकानुसार अध्यापनाचे कार्य केले.
त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी म्हणून आर्यन माने, अनोध माने, साई माने, श्रीधर माने, मनोज सोरटे, साहिल सोरटे या विद्यार्थ्यांनी सकाळच्या परिपाठापासून, तास बदलण्याची बेल, दुपारचा खाऊ वाटप, पटवही व शाळा सुटण्याच्या बेलेपर्यंत सर्व व्यवस्था चोखपणे सांभाळली.
विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या आत्मविश्वास आणि शिस्तीचे सर्व शिक्षकांनी कौतुक केले. यातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि शिक्षकांविषयी आदर अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांनी विद्यार्थी शिक्षकांचे आभार मानले.








