करमाळा प्रतिनिधी: सचिन नलवडे
करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मतदारांना हरकती 30 सप्टेंबर पर्यंत नोंदवाव्या असे आव्हान केले आहे
निर्माण झाली आहे. सन २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये मतदार यादीतील तब्बल ४७ हजार १३७ मतदारांची नावे कमी होण्याची शक्यता असल्याने मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणादरम्यान स्थलांतरित, मृत तसेच दुबार नोंद असलेल्या मतदारांची माहिती तपासण्यात आली आहे. यामध्ये स्थलांतरित ३ हजार ५३५, मृत मतदार १४ हजार ६६६, तसेच दुबार मतदारांचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय काही मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नसल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
मतदारांनी यादी तपासणे आवश्यक
मतदार यादीत आपले नाव आहे का, नावातील तपशील योग्य आहे का आणि आपले मतदान केंद्र बरोबर आहे का, याची प्रत्येक मतदाराने तपासणी करावी. नाव, पत्ता, वय, गाव किंवा छायाचित्रामध्ये त्रुटी आढळल्यास दुरुस्तीचा अर्ज करता येणार आहे.
दुरुस्तीसाठी आधारकार्ड, जन्माचा पुरावा, पत्त्याचा पुरावा तसेच आवश्यक असल्यास पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुनर्निरीक्षणाची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यादीमध्ये आपले नाव आहे का? नावातील तपशील अचूक आहेत का? तसेच मतदान केंद्र योग्य आहे का? याची तपासणी मतदारांनी करावी. नाव गायब असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने नोंद झाल्याचे आढळल्यास संबंधित पुराव्यांसह ३० सप्टेंबरपर्यंत हरकत व दुरुस्ती अर्ज करता येणार आहे
मतदार यादीतील नाव कमी होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले नाव तपासणे आणि त्रुटी असल्यास मुदतीपूर्वी प्रशासनाकडे हरकत नोंदवणे महत्त्वाचे ठरणार आहे.









